Born
March 13th, 1992
Passed Away
October 06th, 2012
Tithi
ASHWIN KRUSHNA PAKSHA SHASTHI (6)
Popularly Known as
Bhaiya (Kattu)
Occupation
Student,B.Arch.(III rd)Nasik
Religion
Jain
Native
Loni , Tal. Rahata (Shirdi), Dist.Ahmadnagar (Maharashtra)
Country
India
You always had a smile to share, Time to give and time to care. A loving nature, A heart of gold, you were the best this world could hold.
Shradhanjali By
Prerana, Shruti,
Vijaya Kataria (Mom)
Sanjay Kataria (Dad)
KATARIA FAMILY, RELATIVES & FREINDS...
Biography of Akshay Sanjay Kataria
" अक्षय "
ज्याचा कधीही क्षय होऊ शकत नाही असा...
--------------------------------------------------------------------------------------------------------------
" अक्षय " ज्याचा कधीही क्षय होऊ शकत नाही असा, लहानपणी पाळण्यात घालतांना नाव ठेवताना कल्पना नसते बाळाच्या पुढच्या आयुष्याची.
आपल्या नावाच्या अर्थाच ओझ घेऊन माणसं जगात नसतात, तसा तो हि नाही जगला. "अक्षय" कटारिया परिवारातला हिराच. या हिऱ्याला अनेक पैलू.
जिथे मानसं वयाच्या ७० रीत सुद्धा आयुष्यात काही करायला वेळच नाही मिळाला असा म्हणतात तिथे अक्षयच्या अवघ्या २० वर्षांच्या आयुष्यावर नुसती नजर फिरवली तरी थक्क व्हायला होतं. जरा आर्थिक परिस्थिती चांगली म्हटल्यावर बऱ्याचश्या तरुण मंडळींना मोह होतो, पब्स, डिस्को थेकचा, व्यसनांचा एकूणच चंगळवादाचा. पण अक्षयला मोह होतो पुस्तकांचा व.पुं.पासून पुं.लं.पर्यंतचा पुस्तकांचा खजिना अक्षय अक्षरशः लुटतो. जिथे तासान तास कॉम्पुटर वर बसून जग आमच्या मुठीत म्हणणारी युंग जनरेशन , पण अक्षय मात्र साठवतोय त्याच्या कॅमेराच्या लेन्स मधून आजूबाजूचा जिवंत निसर्ग, फोटोग्राफीचा नुसता वेडच नाही तर फोटोग्राफिने अक्षयला झपाटलं. आयुष्यात थ्रील पाहिजे यार, हि आजच्या मुलाची भाषा. हे थ्रील अक्षय अनुभवतो स्केटिंग, स्कुबा डायव्हिंग, स्विमिंग करून. खरंतर टीनएज म्हणजे धडपडायचा वय रस्ता शोधण्याचा वय आयुष्यात आपल्याला काय करायचं हे न कळण्याचं वय. पण या वयात आपल्या वडिलांच्या पायावर पाय ठेऊन अक्षयने निवडलं आर्कीटेक्चर हे क्षेत्र.
" पप्पा पैसे तर सगळेच कमवतात मला माणसं कमावायची आहेत "......
हे इतक्या लहान वयातच ठरवलं. मानाने इतकं निर्मल असणाऱ्या अक्षयला शुध्द आणि अभिजात अशा शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाली, त्यात नवल ते काय ? म्हणूनच तर तबला आणि बासरी हि वाद्य त्यानं आपलीशी केली. निसर्ग आणि माणसं यांच्याशी अक्षय मनानं बांधला गेला होतं. म्हणूनच जितक्या आवडीनं तो ट्रेकिंग करायचा तितकीच मजा घेऊन मित्रांसोबत पत्ते, फिल्मस्, क्रिकेट, कार ड्रायव्हिंग यांचा आनंद घेत होता.
प्रेमळ स्वभावाच्या माणसांना जगामध्ये दुबळेपणा, असहाय्यता, गरिबी सहनचं होत नाही. म्हणूनचं तर अक्षय ला अवघ्या २० व्या वर्षी सामाजिक जाणीव होती. त्या जाणीवेतूनच तर अनेक आर्थिक दुर्बल घटकांसाठी आपले मदतीचे हात तो देत होता.
वडीलांशी होणारा नेहमीचा संवाद तर अक्षयचा ठरलेलाच. एक चांगला सच्चा मित्र अक्षयला वडिलांमधेच भेटला होता, आणि अर्थातच वडिलांसाठी अक्षय फक्त मुलगा नाही तर त्यांच्या सुखादुखा:चा साथीदार होतं. कॅलेंडरमधली प्रत्येक तारीख बदलत असते, आज हा काल होत असतो, काल हा परवा होतो परंतु आपण सगळेजण उद्यची अशा, उद्याचे स्वप्न मनात ठेऊन जगत असतो. कॅलेंडरवर असणाऱ्या बारा महिन्यातील प्रत्येक तारीख जगत असतांना त्यातलीच कुठलीतरी तारीख हि प्रत्येक माणसासाठी उद्या काळ ठरणार असतो. पण तरी मनासं जगायचं सोडत नाहीत.
माणसाचा शरीर नश्वर आहे पण आत्मा ईश्वर आहे. आपण लहानपणी ऐकायचो कि मुलं हि देवाघरची फुलं नीट उमलण्या आधीच देव ती पृथ्वीवरून पुन्हा देवाघरी नेतो.
अशाच एका ६ ऑक्टोबर च्या शनिवारी अक्षय सारख्या ज्याच्या नावात क्षय, झिज लिहिलीच नाही त्याच्यावर काळाने घालाच घातला. २०१२ च्या आधी २० वर्षे अनेकदा हि तारीख, तो वार तसेच त्याच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांच्या आयुष्यात आली असेल पण......................पण..................... हा पण आता फक्त पाणच उरलाय. अक्षय सारखी आनंदी स्वतःचा आनंद दुसऱ्याला वाटणारी माणसं काळान हिसकावून नेल्यानं देवाच्या घरातला आनंद संपत आलाय हेच खरं.
पण आजही जेव्हा पहिला पाऊस, मातीचा शुद्ध गंध, संगीताचा शुद्ध स्वर नदीच खळखळनार पाणि, हसण्याचा आवाज या सगळ्यांमध्ये अक्षय असणार आहे...................................................कायम....
Family Tree of Akshay Sanjay Kataria
Vijaya (Mom)
Sanjay Shantilal (Dad)
Prerana
Shruti
Priti
Priyanka
Rohit
Aniket
Pratik
Ashish and Gandhi
Meet and Gandhi
Vruddhi and Gandhi
Gautam and Gandhi
Heena and Munot
Sagar Munot
Shweta & Gandhi
& Gandhi
Pradnya & Kataria
Post a tribute & share memories
Fond Memories & Remembrance
Related Profiles
Post Condolences
Nitin Ramesh Ingale
1 year ago
Suraj
1 year ago
Nitin Ingale
2 years ago
Namita
3 years ago
Nikita
3 years ago